India’s Best Dancer : अजय सिंह बनला शोचा ‘विनर’ ! मिळाले 15 लाख अन्…

पोलीसनामा ऑनलाइन – डान्स रिअ‍ॅलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर (India’s Best Dancer) च्या टॉप 5 फायनलिस्टची निवड गेल्या आठवड्यातच झाली होती. या आठवड्यात ग्रँड फिनाले झाला असून, या शोला त्याचा विजेता मिळाला आहे. अजय सिंह (Ajay Singh) यानं ट्रॉफी त्याच्या नावावर केली आहे. तो शोमध्ये टायगर पॉप म्हणून ओळखला जात होता. इंडियाज बेस्ट डान्सरचा विजेता बनल्यानंतर अजयला ट्रॉफीसह 15 लाख रुपये आणि एक कार मिळाली आहे. या विजयानंतर अजय आणि त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

रविवारी शोचं ग्रँड फिनाले झालं. यात अजयला सर्वांत जास्त व्हाेटिंग मिळालं. तसं तर अजयला आधीपासूनच शोचा विजेता मानलं जात होतं. अजय सिंहची कोरियोग्राफर वर्तिका झा (Vartika Jha) हिलाही 5 लाखांचं बक्षीस मिळालं आहे. अजयनंतर मुकुल जैन दुसऱ्या नंबरवर, तर श्वेता वॉरियर तिसऱ्या नंबरवर आहे.

या शोमध्ये गीता कपूर (Geeta Kapoor), मलायका अरोरा (Malaika Arora), टेरेंस लुईस (Terence Lewis) हे सर्व जज म्हणून दिसून आले होते, तर कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsa Limbachiyaa) हे होस्ट म्हणून दिसले होते.

You might also like