चालू शुटिंगमध्ये ‘हारनेस’वर अडकला कॉमेडियन अन् झाला बेशुध्द, खिलाडी अक्षय कुमारनं वाचवलं (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अक्षय कुमार स्टंट करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळेच अक्षय नेहमीच फिट राहत असतो. अक्षय एक उत्तम कलाकार असून एक जबाबदार व्यक्ती देखील आहे. याचाच प्रत्यय एका कार्यक्रमामध्ये आला. एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान अक्षय कुमारने स्टेजवर धावत जाऊन एका कलाकाराचे प्राण वाचवले आहेत.

अक्षय कुमार आपल्या आगामी हाऊसफुल 4 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘मुव्ही मस्ती’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आला होता. त्यावेळी कॉमेडियन अली असगर आणि परितोष त्रिपाठी एक सादरीकरण करत होते. तेव्हा अचानक पारितोष बेशुद्ध पडला आणि हारनेस (सेफ्टी दोर) वर लटकला. त्यासोबत असलेल्या अलीला याबाबत काहीच समजले नाही.

https://www.instagram.com/p/B3MTlH-B6km/?utm_source=ig_web_copy_link

अक्षय कुमारने वाचवले प्राण
हा सर्व प्रकार अक्षय कुमारच्या लक्षात येताच अक्षय कुमार लगेच पळत स्टेजवर पोहचला आणि हारनेसला लटकलेल्या पारितोषला आपल्या मांडीवर घेतले. मग बाकीच्या क्रू मेंबर्सच्या मदतीने परितोषला खाली घेण्यात आले. याबाबतच व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

परितोष रिअ‍ॅलिटी डानसिंग शो ‘सुपरस्‍टार डांसर’ मध्ये ‘मामा’ च्या भूमिकेत सूत्रसंचालन करताना दिसले होते. त्यासोबतच अली असगर हे कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसून आले होते.

visit : Policenama.com