Ankita Lokhande video : आईसोबत महालक्ष्मी पूजन करताना दिसली ‘अंकिता’, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : वृत्तसंस्था –   टीव्ही ते सिनेमा असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून चर्चेत आहे. अंकिता सुशांतच्या मृत्यूनंतर या प्रकरणावर अनेक गोष्टींचा खुलासा देताना दिसत आहे. अंकिता आणि सुशांत 6 वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. पण काही कारणांवरून त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर सुशांतच्या आयुष्यात रिया आली. त्यातच अंकिता आता पुन्हा एकदा तिच्या काही व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओ मध्ये ती भक्तीमध्ये तल्लीन असलेली दिसत आहे.

https://www.instagram.com/lokhandeankita/?utm_source=ig_embed

अंकिताने तिच्या घरी मोठ्या उत्साहात महालक्ष्मीचं पूजन केलं आहे. या पूजेच्या वेळी ती ट्रेडिशनल मराठी लूकमध्ये दिसत असून तिने लाल रंगाची साडी मराठी स्टाईल मध्ये नेसली आहे. तिच्यासोबत तिची आई देखील पूजा करताना दिसत आहे. दोघींनी पूर्ण विधीसह महालक्ष्मीची पूजा केली. त्यावेळी घराची सजावटही करण्यात आली होती. महालक्ष्मीची पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अंकिता तिच्या आईसोबत घरात सगळीकडे पूजा करताना दिसत होती. ती बाल्कनी, दारात आणि घरात असं सगळीकडे पूजा करताना दिसली. फोटो शेअर करत अंकिताने लिहिलंय, ‘महालक्ष्मी पूजा#gauriganpati, देव आमच्या सोबत आहे.’

अंकिता सोशल मीडियावर सुशांतच्या कुटुंबाची साथ देताना दिसतेय. ती सतत सुशांतला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत सुशांतच्या कुटुंबाच्या पाठीमागे दिसत आहे.