home page top 1

‘या’ अभिनेत्रीसोबत ‘Big Boss’मध्ये येऊ इच्छितात अनुप जलोटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 12 मध्ये खळबळ उडवणारे अनुप जलोटाने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात घुसण्यासाठी सामान बांधल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना अनुप जलोटा म्हणाले की, “मागचा सीजन म्हणजे बिग बॉस 12 मध्ये मी रिलॅक्स करण्यासाठी आणि हॉलिडे साजरा करण्यासाठी आलो होतो. आता मी बिग बॉस 13 मध्येही जात आहे. एकीकडे म्हटले जात आहे की, यावेळी बिग बॉसमध्ये कॉमनर्स सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनुसार, अनुप जलोटा यावेळी सलमान खानसोबत शो होस्ट करताना दिसू शकतात.

मागील वर्षी जसलीन मथारूसोबत शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनुप जलोटा यांना जेव्हा विचारलं की, यावेळी ते कोणासोबत दिसणार आहेत? त्यावर अनुप जलोटा यांनी जी इच्छा व्यक्त केली जे ऐकून सलमान खान थोडा नाराज होऊ शकतो. अनुप म्हणाले की, “यावेळी मी कॅटरीना कैफसोबत शोमध्ये जाऊ इच्छित आहे.

काय आहे सत्य ?

हे सर्वकाही अनुप जलोटा यांनी स्वत: म्हटलं आहे याबाबत शो मेकर्स किंवा कलर्सकडून आतापर्यंत कोणतीच ऑफिशियल अनाऊंसमेंट झालेली नाही. जलोटांच्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि किती नाही हे शोच्या पहिल्या दिवशी समजणारच आहे.

जसलीन मथारूसोबत अनुप जलोटा आले होते चर्चेत

गेल्या सीजनमध्ये अनुप जलोटा केवळ आपली गर्लफ्रेंड जसलीन मथारूमुळे चर्चेत आले होते. याशिवाय ते अनेक टास्कपासून दूरच रहात असे. जर ते खरंच बिग बॉस 13 मध्ये आले तर याबाबत उत्सुकता असेल की, ते नेमका कशा पद्धतीने एन्टरटेंमेंटचा तडका लावतील.

सिने जगत –

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

 

 

 

Loading...
You might also like