’बालिका वधु’ फेम अभिनेत्री अविका गौरनं कमी केलं 13 किलो वजन, सांगितलं कसे झाले हे जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   खुप कमी वयात आपल्या अ‍ॅक्टिंग करियरला सुरूवात करणारी अभिनेत्री अविका गौर हिने आज छोट्या पडद्यावर नाव कमावले आहे. तर शानदार अ‍ॅक्ट्रेस असण्यासह अविका एक मजबूत महिला सुद्धा आहे. ती सोशल मीडियाद्वारे प्रत्येक मुद्द्यावर व्यक्त होताना दिसते. नुकतेच अविका गौरने आपल्या वेट लॉस जर्नीवर वक्तव्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार अविका गौरने सुमारे 13 किलोग्रॅम वजन कमी केले आहे. हे जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशन कशा प्रकारे केले हे तिने सांगितले आहे. यासोबतच अविकाने आपली काही छायाचित्रे सुद्धा शेयर केली आहेत.

अविका गौरने इंस्टाग्रामवर आपली काही छायाचित्रे शेयर केली आहेत. येथे तिने लिहिले आहे – मला अजूनही आठवत आहे ती रात्र, जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहून खचले होते. मी जे पाहिले ते मला अजिबात पसंत आले नाही. मोठे हात, पाय आणि पोट. मी खुप दुर्लक्ष केले होते. जर हे एखाद्या आजारामुळे झाले असते तर काही नव्हते, कारण ते माझ्या नियंत्रणाच्या बाहेर होते. परंतु हे सर्व माझ्यामुळे झाले, कारण मी काहीही खात-पित होते आणि अजिबात वर्कआऊट करत नव्हते. आपल्या शरीराला चांगल्या ट्रीटमेंटची गरज असते. पण याचा अजिबातच आदर केला नव्हता.

तिने पुढे लिहिले आहे – यामुळे मी जशी दिसत होते, ते मला अजिबातच चांगले वाटत नव्हते, इतके की मी आता डान्सिंगसुद्धा एन्जॉय करू शकत नव्हते. मी स्वत:ला इतके जज केले आणि विचार करून इतके वाईट जाणवले की, इतरांनी बोलण्याची गरजच पडली नाही.

अविकाने सांगितले की, एक दिवस मी ठरवले की, आता खुप झाले, आणि मला आता पुढे जायचे आहे. रात्रीत काही बदलले नाही. मी योग्य गोष्टींवर फोकस करण्यास सुरूवात केली…मी योग्य खाणे आणि वर्कआऊट सुरू केले. आणि अनेकदा सेटबॅक्स सुद्धा पाहिले. हे जरूरी होते की मी थांबू नये आणि माझ्यासोबत अनेक लोक होते जे मला मार्गदर्शन करत होते.

तिने पुढे लिहिले आहे – मोठी कथा कमी शब्दात, आज सकाळी मी स्वत:ला आरशात पाहिले आणि मला नजर हटवण्यासारखी कोणतीही कमतरता दिसली नाही. मी स्वत:ला पाहून हसले आणि स्वत:ला म्हणाले की, मी खुप सुंदर आहे.

You might also like