‘गोऱ्या रंगामुळं हातातून निसटले इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स’, ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील अभिनेत्रीचा ‘गौप्यस्फोट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वर्णभेदाबद्दल अनेकदा वादविवाद होताना होताना दिसत असतो. अनेक स्टार्सही या भेदभावाचे शिकार झाले आहेत. जॉर्ज फ्लॉयड यांच्या निधनानंतर अनेकांनी वर्णभेदाचा विरोध केला आहे. भाभीजी घर पर है या मालिकेतील सौम्या टंडन हिनंही वर्णभेदाची शिकार झाल्याचा तिचा अनुभव सांगितला आहे. सौम्यानं याबाबत मोठा खुलासा केला आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, सौम्यानं सांगितलंय की, गोरा रंग असल्यानं तिच्या हातून अनेक इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स निसटले आहेत. ती सांगते की, लोकांना वाटतं की, ती खूप गोरी आहे. त्यामुळंच तिला काम मिळालं नाही. परदेशात अजूनही अशी धारणा आहे की, भारतीय मुली सावळ्या असतात.

सौम्यानं सांगितलं की, तिनं बाहेर जेवढे ऑडिशन दिले सर्वांकडून एवढंच ऐकायला आलं आहे की, अरे तू तर खूपच गोरी आहेस. भारतीय मुलीनी एवढं गोरं नसावं. परदेशी सिनेमात अनेकदा भारतीय लोकांना दाखवायचं असेल तर त्यांना नेहमी गव्हाळ आणि सावळं दाखवलं जातं. याशिवाय ते दुसरा रंग स्विकारत नाही.

सौम्यानं सांगितलं की, त्यांची अशी विचारसरणी आहे की, ब्राऊन स्किन फक्त इंडियन, बांग्लादेशी, पाकिस्तानी लोकांचीच असते. असा विचार करणं चुकीचं आहे.