Video : आदित्य नारायणच्या रिसेप्शनमध्ये ‘कॉमेडियन’ भारतीची पतीसोबत मस्ती ! व्हिडिओ पाहून लोकांनी केल्या वाईट कमेंट्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा सिंगर आणि इंडियन आयडल 12 चा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आदित्य वाजतगाजत लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी 1 डिसेंबर रोजी लग्न केलं आहे.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघं खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. अलीकडेच त्यांची रिसेप्शन पार्टी झाली. यात अनेक सेलेब्स आले होते. यात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया हेदेखील आले होते.

भारती आणि हर्ष यांनी या पार्टीत खूप एन्जॉय केला. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यात भारती काही वेळ म्युझिकवर थिरकतानाही दिसत आहे. सध्या भारतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना हा व्हिडिओ आवडला आहे तर काहींना हा व्हिडिओ खटकला आहे. अनेकांनी यावर वाईट साईट कमेंट केल्या आहेत. अनेकांनी भारती आणि हर्ष यांना ट्रोल केलं आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) कॉमेडियन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harash Limbachiyaa) यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) किला कोर्टानं भारती आणि हर्ष यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता. ज्यावर दि. 23 नोव्हेंबर रोजी (वार सोमवार) सुनावणी झाली. या सुनावणीनंतर आता भारती आणि हर्ष यांचा जामीन एनडीपीएस कोर्टानं मंजूर केला. अशी माहिती होती की, भारतीच्या घरी 86.50 ग्रॅम गांजा मिळाला होता. अलीकडेच एनसीबीनं भारतीला ड्रग्ज देणाऱ्या ड्रग पेडलरलाही अटक केली आहे. जामिनावर सध्या दोघं बाहेर आले आहेत.

You might also like