Drugs Case मध्ये जामीन मिळाल्यानंतर सेटवर परतली भारती सिंह ! शेअर केली पहिली पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) कॉमेडियन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना अटक केली होती. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) किला कोर्टानं भारती आणि हर्ष यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता. ज्यावर आज (सोमवार दि. 23 नोव्हेंबर) सुनावणी झाली. या सुनावणीनंर आता भारती आणि हर्ष यांचा जामीन एनडीपीएस कोर्टानं मंजूर केला. अशी माहिती होती की, भारतीच्या घरात गांजा मिळाला होता. अलीकडेच एनसीबीनं भारतीला ड्रग्ज देणाऱ्या ड्रग पेडलरलाही अटक केली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर आता भारतीनं सोशलवर पहिली पोस्ट शेअर केली आहे.

जामीन मिळाल्यानंतर भारती शूटिंगच्या सेटवर पुन्हा परतली आहे. एक पोस्ट शेअर करत तिनं याबाबत माहिती दिली आहे. फोटोत ती बाहुबलीमधील शिवगामी देवीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. भारती सोबत कृष्णा अभिषेकसुद्धा कटप्पाच्या रोलमध्ये दिसत आहे.

एनसीबीकडून अटक झाल्यानंतर आणि कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर ही भारतीची पहिली पोस्ट आहे. जामीन मिळाल्यानंतर सर्वांत आधी भारतीनं गणपती बाप्पाचं स्मरण केलं होतं. इंस्टा स्टोरीला गणपती बाप्पाचा एक फोटो शेअर करत आरतीही शेअर केली होती.

You might also like