इतकं खराब इंग्रजी असूनही फोटोच्या कॅप्शनमध्ये जबरदस्त इंग्रजी कशी लिहिते शहनाज गिल ? स्वत:च केला ‘खुलासा’ ! वाचून चकित व्हाल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बिग बॉस 13 फेम आणि फेमस पंजाबी सिंगर शहनाज कौर गिल हिची पंजाबी आणि हिंदी चांगली आहे. परंतु तिची इंग्रजी मात्र खूप खराब आहे. खुद्द शहनाजनं बिग बॉसमध्ये असताना याचा खुलासा केला होता. तिनं यावरून अनेकदा स्वत:चीच खिल्ली उडवली होती. असं असलं तरी जेव्हा कधी शहनाज एखादा फोटो सोशलवर पोस्ट करत तेव्हा तिच्या फोटोला छान इंग्रजीत कॅप्शन दिलेलं असतं. याचा खुलासा आता शहनाजनं केलं आहे.

शहनाजची इंग्रजीची बोंब आहे. असतानाही तिचे इंग्रजी कॅप्शन पाहिल्यानंतर अनेकांनी तिला याबाबत प्रश्न केलं आहेत. यानंतर आता तिनं या मागील सत्य चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. अलीकडेच तिनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यालाही तिनं खास इंग्रजीत कॅप्शन दिलं आहे. यासोबत तिनं एक कमेंटही केली आहे ज्यात तिनं तिच्या इंग्रजीचं सिक्रेट सांगितलं आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1268501827303202820?s=20

कमेंटमध्ये शहनाजनं लिहिलं की, “सर्वजण विचारतात की, तुम्हाला इंग्रजी येत नाही तर स्टेटस इंग्रजीत कसे टाकता ? माझ्या डोक्यात जे काही असतं ते मी माझ्या मॅनेजमेंट टीमला सांगते आणि ते इंग्रजीत पोस्ट होऊन जातं. सिंपल… लव्ह यु ऑल.”