‘Bigg Boss’ च्या ‘या’ 7 स्पर्धकांचा झाला मीडियाशी सामना, रश्मी देसाईनं अरहानबद्दल केलं मोठं विधान (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 चं ग्रँड फिनाले 15 फेब्रुवारी रोजी आहे. बिग बॉसच्या या सीजननं प्रेक्षकांना खूपच एंटरटेन केलं आहे. शोमधील 7 स्पर्धक पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधणार आहेत. रश्मी देसाई आणि अरहानच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाली आहे. मीडियानं रश्मी आणि अरहान खानसोबत त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं. तिनं अरहानबद्दल मोठं वक्तव्य केलं.

सध्या शोचा एक प्रोमो व्हिडीओ सोशलवर व्हायरल होतोय. यात दिसतंय की घरातील सर्वच सदस्य प्रेस कॉन्फरंसमध्ये प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. रश्मी देसाई, शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्ला आणि इतरही घरातील लोकांना मीडियानं प्रश्न विचारले. रश्मीला अरहान खानबद्दल प्रश्न विचारण्यात आलं की तिचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे. यावर बोलताना रश्मी म्हणाली, “मला नाही वाटत की, भविष्यात आम्ही सोबत असू. नो बट आय अ‍ॅम डन.” यानंतर पत्रकार म्हणाले की, याचा अर्थ तू सिंगल आणि रेडी टू मिंगल आहे.

https://www.instagram.com/p/B8HWptKBreO/?utm_source=ig_embed

बिग बॉसच्या घरात अरहान खाननं रश्मी देसाईला प्रपोज केलं होतं. परंतु सलमाननं त्याचे काही सिक्रेट सांगितले. रश्मीला समजलं की अरहान विवाहित आहे आणि त्याला एक मुलगाही आहे. यानंतर रश्मी कोसळली होती.