पत्नी रूबीनाची अली गोनीसोबतची मैत्री पाहून भडकला अभिनव शुक्ला ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात रोज काही ना काही ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. अलीकडेच घरात लॉकडाऊनच टास्क घेण्यात आलं, जे नंतर रद्द करण्यात आलं. या टास्कच्या वेळी घरात खूप गोंधळ झाला. खास करून जेवणावरून सदस्यांमध्ये बराच तणाव दिसून आला. शोमध्ये चांगले मित्र असलेल्या अली गोनी आणि अभिनव शुक्ला यांच्यातही वाद होताना दिसला. दोघात खूप जास्त भांडण झालं. नंतर या भांडणाचा परिणाम हा रूबीना आणि अभिनव यांच्या नात्यावर होताना दिसला. अभिनव यामुळं रूबीनावर नाराज झाला की, ती अली सोबत बोलत आहे.

अभिनवला असं वाटतं की, लॉकडाऊन टास्क दरम्यान अली गोनी यानं त्याच्या सोबत गैरवर्तन केलं, त्याचा अनादर केला. त्यामुळं रूबीनानं अलीसोबत बोललंही नाही पाहिजे आणि बसलंही नाही पाहिजे.

रूबीनाला अली सोबत बोलताना अभिनव खूप चिडतो आणि तिला म्हणतो की, तू त्याच्या सोबत का हसतेस ? हे ऐकताच रूबीना हैराण होते. नंतर ती अभिनव सोबत बोलते आणि पूर्ण बाब त्याला समजून सांगते. रूबीनाचा समाचार घेतल्यानं लोकांनीही अभिनवचा समाचार घ्यायला सुरुवात केली.

अभिनव रूबीनासोबत ज्या प्रकारे वागला ते चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी सोशलवरच त्यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. काहींनी त्याला पत्नीसोबत नीट बोलण्याचा सल्ला दिला. काहींनी तर त्याच्या आणि जास्मीनच्या मैत्रीबद्दल बोलायला सुरुवात केली. एका युजर म्हणाला की, रूबीना आणि जास्मीन यांचं भांडण झालं होतं तेव्हा अभिनव जास्मीनसोबत चांगलं बोलत होता. आता तो रूबीना आणि अली यांच्यावर सवाल का उपस्थित करत आहे.