Bigg Boss 14 : साडीत रुबीना दिलैकला पाहून अभिनव शुक्ला झाला फिदा, वाचा रोमँटिक लव्हस्टोरी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बिग बॉस ( bigg boss)14 ची स्पर्धक रूबीना दिलैक आणि अभिनव शुक्लाने 2018 मध्ये विवाह केला आहे. दोघांना फिरायला आवडते. बिग बॉस (bigg boss)14 ची स्पर्धक रूबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला एक कपल म्हणून शोमध्ये सहभागी झाले आहेत. दोघांनी शोमध्ये अजूनही कोणत्याही प्रकारचा पीडीए दाखवलेला नाही. त्यांनी म्हटले आहे की, शोच्या दरम्यान ते आपले नाते मध्ये येऊ देणार नाहीत.

अभिनव आणि रुबीनाने ’छोटी बहू’ मध्ये सोबत काम केले आहे. मात्र, दोघांमध्ये सेटवर कमी बोलणे होत होते. अभिनवने रुबीनाला मित्राच्या घरी गणपती उत्सावात पाहिले होते. यानंतर तो तिच्या प्रेमात पडला.

एका इंटरव्ह्यूमध्ये अभिनव शुक्लाने म्हटले होते की, मी खरं बोलत आहे, ती साडीत खुप सुंदर दिसत होती. याशिवाय तिलाही माझ्यासारखेच फिरायला आवडते आणि ती सुद्धा खुप वर्कआऊट करते. अशा व्यक्तीचा नेहमी सन्मान झाला पाहिजे, ती माझ्या जीवनात मुल्य वाढवते, ती मला प्रेरणा देते. याशिवाय मला जी गोष्ट आकर्षित करते, ती आहे, तिचे बोलणे, ती खुप सुंदर आहे आणि सन्मानिय आहे. रुबीना आणि अभिनवने शिमलामध्ये 2018 मध्ये विवाह केला होता.

अभिनव शुक्लाबाबत बोलताना रूबीनाने म्हटले, तो पूर्णपणे सपोर्ट करतो. तो इतका क्रिएटीव्ह आहे की, तो आपल्या क्रिएटिव्हिटीने चकित करतो. तो जेव्हा काही नवीन करतो, माझे त्याच्यावर प्रेम जडते. मी त्याच्यासोबत खुप खुश आहे आणि त्याला माहित आहे की, माझा प्रत्येक दिवस कसा खास बनवायचा आहे. रुबीनाने अभिनवबाबत म्हटले, अभिनवमुळे मी जीवनात पुढे गेली आहे. तो मला नेहमी प्रेरित करतो आणि मोटिव्हेट करतो. तो मला नेहमीच सहकार्य करतो आणि माझ्यासाठी उभा राहातो. रुबीना दिलैकने हिंदू पद्धातीने विवाह केला होता.

You might also like