Bigg Boss 14 : कविता कौशिकची शुद्ध हिंदी पाहून हसू आवरणं झालं मुश्किल ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. अलीकडेच कुमार सानू (Kumar Sanu) यांचा मुलगा जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) हा घरातून एलिमिनेट झाला. गेल्या सोमवारी बिग बॉसनं नॉमिनेशन टास्क दिलं. यात 6 सदस्य नॉमिनेट झाले. एलिमिनेशननंतर बिग बॉसच्या घरातील सध्याची कॅप्टन कविता कौशिक (Kavita Kaushik) हिला एका नॉमिनेशनला रिप्लेस करण्याची स्पेशल पावर दिली. यावेळी कवितानं एजाज खानला (Ajaz Khan) सुरक्षित करत अली गोनी याला (Aly Goni) नॉमिनेट केलं. यावेळी कविता शुद्ध हिंदीत बोलताना दिसली.

कविताचं भाषण ऐकून घरातील सर्व लोकांना हसू आवरणं अवघड झालं होतं. कविताचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे ज्यात ती अली गोनीबद्दल बोलताना दिसत आहे. घरातले लोक कविताचा हा अवतार पाहून खूपच हसत होते. तिच्या प्रत्येक शब्दावर त्यांना हसू येत होतं.

कविताची शुद्ध हिंदी पाहून रुबीना दिलैक (Rubina Dilaik) देखील म्हणते की, मी हे सगळं नाही ऐकू शकत आणि जोरात हसू लागते व किचनमध्ये निघून जाते. अलीसुद्धा गार्डन एरियात जाऊ लागतो, ज्यानंतर अभिनव त्याला थांबवतो.

कविताचा हिंदी बोलताना हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनाही हसू आवरणं मुश्किल झालं आहे. अनेक कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

You might also like