Bigg Boss 14 : निक्की आणि जान यांच्या मैत्रीला तडा, ‘कॅप्टन्सी’मुळं ताटातूट होईल का?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ‘बिग बॉस 14’ मधून आतापर्यंत 2 स्पर्धक बाहेर पडले आहेत. दुसर्‍या आठवड्यात घरातून बेघर झालेल्या सारा गुरपालनंतर काल म्हणजेच 21 ऑक्टोबरला शहजाद देओलनेही बिग बॉसच्या घराला निरोप दिला. म्हणजेच आता स्पर्धा घरातल्या 9 सदस्यांमध्ये आहे. सध्या कॅप्टन्सीच्या पदावरून घरात भांडण सुरू आहे आणि यामुळे दोन मित्रांमध्ये अंतर पडत चालले आहे. तथापि, बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीमुळे मैत्रीत ताटातूट होणे ही सामान्य गोष्ट आहे. सध्या ही ताटातूट निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनच मजबूत बॉन्ड शेअर करणारे निक्की आणि जान आता आपापला गेम खेळताना दिसत आहेत.

वास्तविक, घर सध्या दोन गटात विभागले गेले आहे, एका बाजूला जॅस्मिन, रुबीना आणि अभिनव आणि दुसरीकडे राहुल, निक्की, जान आणि निशांत आहेत. पण निक्कीचा गट तुटत चाललेला दिसत आहे. कलर्सने आजच्या एपिसोडचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये निशांत, राहुल, जान आणि निक्की यांच्यात कॅप्टन्सी संदर्भात टक्कर होताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कॅप्टन म्हणून तिला कन्सीडर करण्यात यावे असे निक्कीचे म्हणणे आहे, परंतु जान आणि निशांत या बाबतीत तयार होत नाहीत. तथापि राहुलला याबाबतीत फारशी अडचण नाही, परंतु जान आणि निशांतला निक्की कॅप्टन व्हायला नको आहे, कारण जर ती कॅप्टन झाली तर ती रागात त्यांना त्रास देण्यासाठी आपल्या मनाने काहीही काम करायला लावू शकते. यामुळे जान आणि निक्की यांच्यात वाद झाल्याचे दिसत आहे, त्यानंतर निक्की रडू लागते आणि म्हणते की आता ती फक्त स्वत:साठी खेळेल. आता हे येणारी वेळच सांगेल की निक्की आणि जान यांची मैत्री टिकून राहते की कॅप्टन्सीमुळे बळी चढते.

You might also like