Bigg Boss 14 : ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आता ‘अदालत’ ! जज बनून येणार फराह खान (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात चाहत्यांना नेहमीच काही ना काही नवीन पाहायला मिळत असतं. यात खास म्हणजे यात होणारी भांडणं. यानंतर स्पर्धकांकडून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप. अनेकदा काय चूक काय बरोबर हे ठरवण्यासाठी प्रेक्षकांकडून व्हाेटिंग घेतलं जातं. यावेळी आता घरात अदालत लागणार आहे. बिग बॉसमधील या अदालतमध्ये स्पर्धकांना सवाल जवाब केले जातील.
कलर्सनं त्यांच्या ऑफिशियल इंस्टा अकाउंटवरून एक प्रोमो शेअर केला आहे. यातून या अदालतबद्दल माहिती देण्यात आली आहे. या अदालतमध्ये जज स्पर्धकांवर लागलेल्या आरोपांचा तपास करणार आहेत. व्हिडिओत रुबिना दिलैक, पवित्रा पुनिया आणि एजाज खान दिसत आहेत. सोबतच सर्व घरातल्या सदस्यांची रिअॅक्शनही दिसत आहे.
बिग बॉसच्या अदालतमध्ये 3 जजदेखील येणार आहेत. यात डान्सर, फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खान सोबत 2 पत्रकारही येणार आहेत. याशिवाय प्रोमोत दाखवलं गेलं आहे की, शोचा स्पीड वाढवण्याबद्दल बोललं गेलं आहे. बिग बॉस सदस्यांना सांगत आहे की, आता प्रवास आणखी खडतर होणार आहे. यानंतर पडदा बाजूला सरतो आणि एजाज खान दिसतो. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हावभाव दिसत आहेत. खास बात अशी की, एजाज हसत आहे.