Bigg Boss 14 : राहुल वैद्यनं ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला घातली अंघोळ ! अलीनंही केलं ‘हे’ काम (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे. राखी सतत चाहत्यांचं मनोरंजन करत आहे आणि सतत अटेंशन घेताना दिसत आहे. आपल्या पागलपंतीमुळंही ती सर्वांना हसवत असते. पुन्हा एकदा राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात राहुल वैद्य आणि अली गोनी तिला अंघोळ घालताना दिसत आहेत.

बिग बॉसनं घरातील सदस्यांना नव्या अडचणीत टाकलं आहे. त्यांनी घरातील बाथरूम एरिया जप्त केला आहे. यामुळं घरातल्यांसाठी नवीन अडचण निर्माण झाली आहे. राखीनं अंघोळीसाठी गार्डन एरियाची निवड केली आणि अंघोळीसाठी ती स्विमिंग पूलपाशी बादली घेऊ गेलीसुद्धा. राखीला बाहेर अंघोळ करताना पाहून राहुल वैद्य हैराण होतो. परंतु ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए असं म्हणत तो राखीला शॅम्पू बाथ देतो.

यावेळी राखी म्हणते, मी माझ्या आयुष्यात अशी कधी अंघोळ केली नाही. यावर राहुल म्हणतो की, आज आमचं नशीब उजळलं आहे. यानंतर राखी अली गोनीलाही कंडिशनर लावायला सांगते.

चॅनलनं याचा एक प्रोमोही शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओची खूप चर्चा सुरू आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच मजेदार वाटत आहे.

राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.