Bigg Boss 14 : कंट्रोल न झाल्यानं ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतनं पँटमध्येच सोडलं युरीन ! रूबीनाला म्हणाली – ‘कुणला सांगू नकोस’

बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात रोज काही ना काही ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. मंगळवारी बिग बॉसनं घरातील सदस्यांना नवीन टास्क दिलं यात घरातील सदस्य दोन टीममध्ये विभागले गेले. या टास्कमध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) रूबीनाच्या टीममध्ये आहे, तर अर्शी खान राहुल वैद्यच्या टीममध्ये आहे. राखी या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टास्क दरम्यान पँटमध्येच तिनं युरीन सोडलं.

बिग बॉसनं घरातल्या सदस्यांसाठी बाथरूमची सोय देखील केली होती. परंतु अर्शी खान हे ठरवते की, रूबीनाच्या टीममधील कोणत्याच सदस्याला बाथरूमला जाऊ देणार नाही. हे ऐकून राखी खूप संतापते. ती अर्शीला म्हणते की, मेडिकल इश्युमुळं तिला ब्लॅडर कंट्रोल करता येत नाही. डॉक्टरांनी लघवी रोखण्यास मनाई केली आहे.

काही वेळात राखीसाठी हे कंट्रोल करणं खूप अवघड होऊन जातं आणि ती पँटमध्येच युरीन सोडते. यानंतर राखीनं तिची टीम लिडर रूबीनाला बोलावलं आणि तिला तिचा ड्रेस दाखवला. राखीनं तिला सांगितलं की, तिला कंट्रोल नाही झालं आणि पँटमध्येच तिचं युरीन निघालं राखीनं तिला असंही सांगितलं की, याबद्दल कुणाला काही बोलू नकोस.

यानंतर रूबीनानं राखीची मदत केली. तिनं घरात जाऊन अंडरगारमेंट्स बदलण्यास सांगितलं. राखीच्या पर्सनल हायजीनची काळजी घेत रूबीनानं हा निर्णय घेतला. इतकंच नाही तर टास्कच्या पहिल्या दिवशी राखी भुकेनंही वैतागलेली दिसली.