‘शो’मध्ये एंट्रीसाठी केली शरीरसुखाची मागणी ; महिला पत्रकाराच्या आरोपाने ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिव्हीजनचा विवादीत शो बिग बॉस तेलगूच्या तिसऱ्या सीजनचा टेलिकास्ट होण्याआधी हा शो अडचणीत सापडताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, हा शो 21 जुलै रोजी सुरु होणार होता. हा शो सुरु होण्याआधीच हैद्राबादमधील एका महिला पत्रकाराने या ‘शो’शी निगडीत असणाऱ्या 4 लोकांविरोधात केस दाखल केली आहे. या महिला पत्रकराचं म्हणणं आहे की, शोमध्ये एंट्रीसाठी तिच्याकडे सेक्शुअल फेवरची मागणी करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला पत्रकाराने तक्रार दाखल करताना म्हटले की, शो च्या ऑर्गनायजर्स लिस्टमध्ये सामिल 4 लोकांनी तिच्याकडे फायनल राऊंडमध्ये एंट्रीसाठी सेक्शुअल फेवरची डीमांड केली होती. यानंतर महिला पत्रकाराने हैद्राबादमधील बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात आयपीसीमधील कलम 354 नुसार चार लोकांवर केस दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अनेकांना माहिती असेलच की, बिग बॉस सीजन 3 हा शो साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन होस्ट करणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाची पुष्टी करत बंजारा हिल्सचे एसीपी श्रीनिवास राव म्हणाले की, “महिला पत्रकाराला मार्चमध्ये शो कडून कॉल आला होता की, तिची तेलगू बिग बॉस सीजन 3 साठी निवड झाली आहे. यानंतर या पत्रकाराने तिथे जाऊन त्या 4 लोकांची भेट घेतली. तिथेच तिच्याशी गैरवर्तन करण्यात आलं. याशिवाय त्याच चार लोकांनी त्या महिला पत्रकाराला फायनल तिकीटासाठी बॉसला खुश करण्यास सांगितले.”


पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

Loading...
You might also like