चिंकी व मिंकीचा ‘मादक’ अंदाज अन् स्टाईलवर चाहते फिदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सोनी वाहिनीवरील कॉमेडीकिंग कपिल शर्मा यांचा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसलेल्या सुरभी व समुद्धी या जुळ्या बहिणींना आपण चिंकी व मिंकी या नावाने ओळखतो. सध्या या चिंकी व मिंकीचे बोल्ड फोटोने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. चिंकी व मिंकी त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखल्या जातात. दोघीही बहीणी अगदी हुबेहुब सेम टू सेम दिसतात. दोघींचा बोल्ड अंदाज आणि त्यांच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत. इन्स्टावर चिंकी व मिंकीला 53 हजारांपेक्षा अधिक लोक फॉलो करतात.

चिंकी व मिंकी या दोन्ही बहिणींचा बोलण्याचा अंदाजही सारखा आहे. दोघींना एकत्र पाहिल्यावर कोण चिंकी अन् कोण मिंकी हे ओळखता येणे कठीण आहे. कपिल शर्मा शोमध्ये दिसल्यानंतर तर दोघीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. दोघींच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाली आहे. चिंकी-मिंकी दोघी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. स्वत:चे रोज नवे फोटो आणि व्हिडीओ दोघीही शेअर करतात. दोघींचा बोल्ड अंदाज आणि त्यांच्या स्टाईलवर चाहते फिदा असून त्यांनी फोटो शेअर केला रे केला की तो लगेच व्हायरल होतो.