‘कमल हासन यांचा शो Bigg Boss पाहिल्यानं लहान मुलंच नव्हे तर चांगले कुटुंबही बिघडतील’ : CM पलानीस्वामी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिग बॉस तमिळ (Bigg Boss Tamil) या शोवरून तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी (CM K. Palaniswami) यांनी मक्कल निधी मय्यम (MNM) चे संस्थापक अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अ‍ॅक्टर्स लोकांसाठी चांगलं काम करू शकत नाही. त्यांचं काम फक्त चांगल्या कुटुंबांना बिघडवणं आहे. त्यांच्या शोमुळं लहान मुलंच नाही तर चांगले कुटुंबही बिघडतील.

MNM प्रमुखांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला घेरल्यांनतर पलानीस्वामी यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले, हासन यांनी रिटायरमेंटनंतर पार्टी लाँच केली आहे. त्यांना राजकारणाबद्दल काय माहित आहे. ते बिग बॉसची मेजवानी देत आहेत. जर तुम्ही ते चॅनल्स पाहिले तर लहान मुलंच नाही तर चांगले कुटुंबही बिघडतील.

मुख्यमंत्री पुढं म्हणाले, कुणीही अ‍ॅक्टर्सवर विश्वास ठेवू शकत नाही. कारण ते लोकांचं भलं करू शकत नाहीत. त्यांचं काम फक्त चांगल्या कुटुंबांना बिघडवणं आहे.

पलानीस्वामी यांनी टीका केल्यांनतर कमल हासन यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, त्यांना आनंद आहे की, मुख्यमंत्री देखील रिअ‍ॅलिटी शो पाहतात.

कमल यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ते इंडियन 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहेत. एस शंकर हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत.