CM ठाकरेंनी शुटींग सुरू करण्याबाबत ‘प्रोड्युसर-डायरेक्टर’ सोबत घेतली बैठक, ‘या’ गाण्यानं केला ‘समारोप’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीसोबत अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यांनी डायरेक्टर, प्रोड्युसर याना फिल्म सिटी सुरू करण्याला आणि शुटींगसाठी प्लॅन तयार करण्यासाठी सांगितलं आहे ज्यावर सरकार लवकरच निर्णय घेईल. सर्वात मजेदार बाब अशी की, या बैठकीचा समारोप एका गाण्यानं झाला.

टीव्ही आणि सिनेमाची प्रोड्युसर आणि डायरेक्टर एकता कपूर हिनं या मीटींगबद्दल सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. मीटींग खूप सकारात्मक झाली असं तिनं सांगितलं आहे. सीएम ठाकरेंसोबत ज्यांनी बातचित केली त्यात एकता कपूर सहित पुनीत गोयंका, एन पी सिंह, MD-CEO-Viacom18 राहुल जोशी, माधवन, पुनीत मिश्रा, अभिषेक रेगे, दीपक धर, आदेश बांदेकर, डॉ संजय मुखर्जी, विकास घारेलु, सुधीर नाईक असे अनेक लोक समाविष्ट होते.

एकतानं लिहिलं की, “आम्ही मुख्यमंत्र्यांना बिजनेस आणि नोकऱ्यांमध्ये येणाऱ्या घसरणीबद्दल सांगितलं. पुन्हा शुटींग करण्याचे मार्गही आम्ही त्यांना सांगितले. शुटींग करताना सुरक्षेची काळजी कशी घ्यावी यावरही आम्ही बोललो. एक व्यापक काम करण्याचा प्लॅन तयार करण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं. सर्वात मजेदार बाब अशी की, डायरेक्टर प्रोड्युसरच्या या बैठकीचा समारोप एका गाण्यानं झाला. आने वाला पल जाने वाला है असं ते गाणं आहे.