एकदमच बदलली TV वरील ‘संस्कारी’ अन् ‘भोळी-भाबडी’ सून, थेट ‘बाथटब’मध्ये दिल्या नको ‘तसल्या’ पोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीची संस्कारी बहू अशी इमेज असणाऱ्या एका अभिनेत्रीनं नुकतंच एक बोल्ड फोटोशुट केलं आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. देबिना बोनर्जी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. आपल्या सुपरबोल्ड फोटोंमुळं देबिनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या देबिनाच्या या फोटोशुटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

देबिनानं नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवरून तिच्या नव्या फोटोशुटमधील काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आहेत. या नव्या फोटोत देबिना बाथटबमध्ये बोल्ड अवतारात दिसत आहे. बाथटबमध्ये फोम आणि गुलाबाच्या पाकळ्यांमधेय बुडालेली देबिना प्रचंड हॉट दिसत आहे. तिनं केसात एक फूलदेखील माळलं आहे.त मादक पोज देणाऱ्या देबिनानं सर्वांनाच घायाळ केलं आहे.

देबिनाचा हा अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे. सध्या तिचं हे लेटेस्ट सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. देबिनानं याआधीही बोल्ड फोटोशुट केलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे फोटोशुट करण्याची ही तिची काही पहिलीच वेळ नाही.

देबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कलर्सवरील विष या मालिकेत ती दिसली होती. आता ही मालिका बंद झाली आहे. 2008 साली आलेल्या रामायण या मालिकेत तिनं सीता मातेची भूमिका साकारली होती. देबिनाचा पती गुरमीत चौधरी यानं या मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारली होती. याशिवाय चिडीयाघर या कॉमेडी शोमध्ये तिनं एका साध्या बहुची भूमिका साकारली होती. सध्या ती कामातून ब्रेक घेत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

https://hindi.news18.com/news/entertainment/tv-debina-bonnerjee-bold-photoshoot-in-bathtub-latest-instagram-photos-viral-utk-2892559.html