चायनीज Apps वर बंदी घातल्यानंतर TV ची ‘सीता’ दीपिका चिखलियानं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

भारत सरकारनं आता 59 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक आणि युजी ब्राऊजर यांचाही समावेश आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सरकारनं हे पाऊल टाकलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात सुरू असणारा सीमावाद कमी होत नाहीये अशात सरकारनं हे पाऊल टाकलं आहे. 15 जून रोजी या सीमावादात भारताचे 20 जवान शहिद झाले होते आणि 70 जवानं गंभीर जखमी झाले होते. यावर आता बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. रामायणमधील सीता दीपिका चिखलिया हिनंही यावर भाष्य केलं आहे.

दीपिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिनं सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दीपिकानं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. दीपिका लिहिते की, “जे करायचं ते करा. एक ठाम भूमिका घ्या आणि स्थानिक व्यापारी आणि व्यापाराचं समर्थन करण्याला पाठिंबा द्या. आपल्या दैनंदिन जीवनात असणाऱ्या अशा शेजाऱ्यांची उपस्थिती मिटवण्याच्या प्रवासाला सुरुवात करा.”

https://www.instagram.com/p/CCCzyHIJ44f/?utm_source=ig_embed

या पोस्टमध्ये दीपिकानं तिचा जो फोटो अपलोड केला आहे. त्यावर लिहिलंय की, “शेजाऱ्यावर प्रेम करा. परंतु फक्त तोपर्यंत जोपर्यंत ते एलसी किंवा एलओसी पार करत नाहीत.”

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच ती लवकरच ती एका सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका साकारणार आहे. दीपिक आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये महिला गव्हर्नरचा रोल साकारणार आहे. सरोजिनी नायडू असं तिच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. दीपिकानं इंस्टावरून एक पोस्टर अपलोड करत याबाबत माहिती दिली होती.