देवोलिना भट्टाचार्यनं शेअर केली दिव्या भटनागरची Audio Clip ! झाले अनेक शॉकिंग खुलासे

पोलिसनामा ऑनलाइन – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अ‍ॅक्ट्रेस दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) चं सोमवारी (दि 7 डिसेंबर 2020) कोरोनामुळं निधन झालं. अवघ्या 34 व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. दिव्याच्या निधनानंतर तिची फ्रेंड अ‍ॅक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) नं एक व्हिडीओ पोस्ट करत दिव्याचा पती गगन गबरू (Gagan Gabru) वर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर कुटुंबीयांनी आणि दिव्याच्या भावानं देखील देवोलिना म्हणते त्याप्रमाणे दिव्याचा पती गगन गबरू वर दिव्याला मारहाण आणि तिचा मानसिक तसेच शारीरिक छळाचा आरोप केला होता. गगननं त्याच्या इंस्टावरून दिव्याचे एन्जॉय करतानाचे काही व्हिडीओ शेअर करत कुटुंबीयांच्या आरोपांना प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता देवोलिनानं सोशलवर दिव्याची एक ऑडीओ क्लीप शेअर केली आहे.

देवोलिनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिव्याची ऑडिओ क्लीप आहे. दिव्या तिच्या पतीच्या हरकतींबद्दल सांगताना दिसत आहे. देवोलिनानं तिच्या पोस्टमध्ये त्या लोकांवरही निशाणा साधला आहे जे तिच्या कठिण काळात दिव्या सोबत उभे राहिले नाहीत.

ऑडियो क्लीपमध्ये दिव्या सांगत आहे की, पती तिला खूप टॉर्चर करतो. तो तिच्या मम्मी आणि भावाला धमकी देत आहे. लॉकडाऊनमध्ये तो तिला बेल्ट आणि आणि चपलेनं मारत होता. ती पळून गेली कारण तिच्या पतीनं कुटुंबाला नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली होती.

दिव्या रडत रडत सांगत आहे की, प्रत्येकानं मला सांगितलं होतं की गगन सोबत लग्न करू नको. परंतु तिनं ऐकलं नाही. तिच्या पतीनं जाणून बुजून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले नव्हते. तिला फॅमिली वाढवायची होती. याशिवाय दिव्यानं मानसिक शोषणाबद्दलही सांगितलं आहे.

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिनं गुलाबोची भूमिका साकारली होती.