काय सांगता ! होय, नेहा कक्कर आणि आदित्य नारायणनं केलं ‘गुपचुप’ लग्न ? समोर आला ‘हा’ व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल 11 ची जज आणि फेमस सिंगर नेहा कक्कर आणि शोचा होस्ट आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहेत. परंतु अद्याप दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पंरतु एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात आदित्य नेहाला वरमाला घालताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या दोघांच्या सोबत जज आणि म्युझिक डायरेक्टर विशाल ददलानीही दिसत आहे. एक ब्राह्मणही दिसत आहे जो मंत्रपठण करत आहे. सर्वकाही स्पष्ट दिसत असलं तरी यात एक ट्विसट आहे.

https://www.instagram.com/p/B8etGT5hCO8/?utm_source=ig_embed

तुम्हाला व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटत असेल तर थोडं थांबा. कारण हे नेहा आणि आदित्यचं रिअलवालं लग्न नाही तर इंडियन आयडलच्या सेटवरील लग्न आहे जे मजाक मस्तीत करण्यात आलं आहे. या व्हिडीओत शोमधील काही स्पर्धकही दिसत आहेत. सर्वच्या सर्व मस्ती करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आदित्यचे वडिल फेमस सिंगर उदित नारायण यांनी सांगितलं होतं. की, नेहा आणि आदित्यच्या लग्नाच्या अफवा या शोचा टीआरपी बूस्ट करण्यासाठी पसरवण्यात आल्या आहेत.