Video : मारहाणीच्या आरोपांनंतर पती गगननं शेअर केले दिव्या भटनागरचे ‘हे’ व्हिडीओ ! पहा घरात कशी रहायची अ‍ॅक्ट्रेस

पोलीसनामा ऑनलाइन – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अ‍ॅक्ट्रेस दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) चं सोमवारी (दि 7 डिसेंबर 2020) कोरोनामुळं निधन झालं. अवघ्या 34 व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. दिव्याच्या निधनानंतर तिची फ्रेंड अ‍ॅक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) नं एक व्हिडीओ पोस्ट करत दिव्याचा पती गगन गबरू (Gagan Gabru) वर अनेक गंभीर आरोप केले होते. इतकंच नाही तर कुटुंबीयांनी देखील देवोलिना म्हणते त्याप्रमाणे दिव्याचा पती गगन गबरू वर दिव्याला मारहाण आणि तिचा मानसिक तसेच शारीरिक छळाचा आरोप केला आहे. कुटुंबीय गगन विरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल करण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच दिव्याची चॅटींग समोर आली होती यात दिव्या सांगत आहे की, तिला गगन सोबत लग्न करायचं नव्हतं. पंरतु तिला धमकावून तिच्यासोबत गगननं लग्न केलं होतं असं दिव्या सांगत आहे. गगन दिव्याला बेल्टनं मारत होता अनेकदा त्यानं तिच्या हाताची बोटं मोडल्याचाही उल्लेख तिच्या चॅटमध्ये दिसत आहे.

देवोलिनानं केलेल्या आरोपांवर गगननं याआधीच प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यानं कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. गगननं त्याच्या इंस्टावरून काही व्हिडीओ शेअर केले आहेत. सोबत त्यानं लिहिलं की, ही होती माझी दिव्या, जिच्यासाठी काही लोक म्हणत आहेत की, मी तिच्या सोबत जबरदस्तीनं लग्न केलंय, मेंटली टॉर्चर करत होतो, जिला मी खोलीत बंद करून ठेवलं होतं. मारहाण केली आणि लग्नानंतर तिला नोकराणी बनवलं.

https://www.instagram.com/p/CIob1UelE4c/?utm_source=ig_embed

 

दिव्याचं इंस्टाग्राम तिचा भाऊ देवाशीष भटनागर हँडल करत आहे. त्यानं अ‍ॅक्ट्रेसचं चॅटींग शेअर केलं आहे ज्यात दिव्या सांगत आहे की, गगननं अनेकदा तिची बोटं मोडली आहेत. यात दिव्या म्हणते, मी सहन करत होते. बहुतेक त्याच्यावर केस झाल्यानं तो फ्रस्ट्रेट होता. यानंतर त्यानं मला धमकावून लग्न केलं. मी नव्हते करत. प्रत्येक गोष्टीवर मारतो. माझ्या हाताची बोट तर माहिती नाही किती वेळा मोडली असतील.