Bigg Boss 14 : ऐजाज खाननं मधूनच सोडलं ‘बिग बॉस’ ! ढसा-ढसा रडू लागले अर्शी आणि अली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या ट्र्रॉफीच्या मानकरींपैकी एक मजबूत नाव मानलं जाणारा ऐजाज खान (Eijaz Khan) यानं अचानक या शोमधून बाहेर होणार आहे. त्यानं नियमही तोडला नाही आणि त्याला वोटींगचीही कमी नाहीये. त्याच्या बाहेर पडण्याचं कारण हे वर्क कमिटमेंट असल्याचं सांगितलं जात आहे. अशी माहिती आहे की, ऐजाज खान आपल्या एका शोच्या शुटींगसाठी शोच्या बाहेर पडत आहे. बिग बॉसच्या ताज्या प्रोमोत ऐजाजच्या जागी देवोलीना घरात एंट्री करताना दिसत आहे.

ऐजाज खान या घरात त्याचा राग, त्याची भांडणं, को-कंटेस्टेंट पवित्रा पुनिया सोबत लव अँगलमुळं खूप चर्चेत आला होता. ताज्या प्रोमोत बिग बॉस स्वत:च ऐजाच्या या घरातील 106 दिवसांबद्दल बोलताना तो घरातून बाहेर पडण्याची घोषणा करत आहे. हे ऐकताच सारे स्पर्धक चकित होतात. अर्शी खान तर रडूच लागते.

समोर आलेल्या रिपोर्टानुसार, ऐजाज खान आपल्या एका शोच्या शुटींगसाठी शोच्या बाहेर पडत आहे. त्याला नाही वाटत की, त्याच्यामुळं पूर्ण क्रूनं वाट पहावी. बिग बॉसचा कालावधी वाढल्यानं आता ऐजाजला बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. हेच ऐजाजच्या अचानक बाहेर पडण्याचं कारण सांगितलं जात आहे,.

ऐजाजनं अलीला आपला लहान भाऊ आणि अर्शी खानला लहान बहिण मानलं होतं. त्यामुळं ऐजाजच्या बाहेर जाण्यामुळं दोघंही खूप इमोशनल होताना दिसणार आहेत.