‘काम्या’च्या दुसऱ्या लग्नाबद्दल एकानं म्हटलं, ‘मुलं आहेत तर लग्न का ?’, ‘चंद्रमुखी चौटाला’नं दिलं जोरदार ‘प्रत्युत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री काम्या पंजाबी तिचा बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत लग्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 10 फेब्रुवारी रोजी दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. असं असताना काही लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत तर काहींना त्यांच्या लग्नापासून अडचण आहे. एकानं काम्याला या वयात लग्नाबद्दल प्रश्न विचारला आहे. काम्याची मैत्रिण कविता कौशिक म्हणजे एफआयआर मालिकेतील लेडी इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटालानं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काम्या पंजाबी सतत इंस्टाग्रामवरून तिचे काही फोटो शेअर करताना दिसत आहे. रविवारी तिनं हळदी समारंभाचे फोटो शेअर केले होते. यावर एकानं कमेंट केली की, “तुला मुलं आहेत तर तू हे का करत आहेस ? म्हणजे पुन्हा एकदा लग्न ?”

काम्याची बेस्ट फ्रेंड कवितानं या युजरला प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, “कारण जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुम्हाला आयुष्यभरासाठी एक साथी, एक मित्र, बेस्ट फ्रेंड, सोलमेट, पार्टनर मिळतो. मुलं जन्माला घालण्याच्या पलीकडेही एक आयुष्य असतं. जे लोक आपल्या आयुष्यात सुख शोधत आहेत त्यात त्रुटी शोधणं बंद करा. काही बकवास प्रश्न विचारण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी खुश व्हायला शिका.”

kamya punjabi

40 वर्षीय काम्याला 9 वर्षांच मुलगी आहे. तिचं नाव आरा आहे. 2013 साली काम्यान पती बंटी नेगीपासून घटस्फोट घेतला होता. शलग आणि काम्या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. शलभला देखील एक मुलगा आहे.