Video : ‘कोरियोग्राफर’ गणेश आचार्यनं कमी केलं जवळपास 100 Kg वजन ! कपिल शर्मा म्हणाला – ‘तुम्ही 2 माणसं गायब केलीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस कोरियोग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) नं अलीकडेच असं काही ट्रान्सफॉर्मेशन केलं की, सर्व त्याला पाहून दंग झाले. या वीकेंडला गणेश द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये दिसणार आहे. सध्या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात कपिल गणेशची त्याच्या वजनावरून मस्करी करताना दिसत आहे.

सोनी चॅनलनं शोचा प्रोमो व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. यात पाहुणे म्हणून आलेले गणेश आचार्य, गीता कपूर (Geeta Kapoor) आणि टेरेंस लुईस (Terence Lewis) मस्ती करताना दिसत आहेत. यात कपिल गणेशला विचारतो तुम्ही किती वजन कमी केलंय. यावर कपिल म्हणतो तुन्ही तर दोन माणसं गायब केली. यानंत सारेच हसू लागतात. याशिवाय कपिल गीता सोबत खूप फ्लर्टींग करतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सध्या प्रोमो व्हिडीओची सोशलवर जोरदार चर्चा आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कपिल शर्मा शोमध्ये चंदन प्रभाकर, भारती सिंह आणि सुमोना चक्रवर्ती आपापल्या अंदाजात मनोरंजन करताना दिसत असतात.