Video : 25 वर्षापुर्वीच्या ‘राजा बाबू’ सिनेमातील गाण्यावर गोविंदा आणि माधुरीने धरला ‘ठेका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गोविंदाचा 1994 साली आलेला सुपरहिट सिनेमा राजा बाबू हा सर्वांना आजही स्मरणात आहे. या सिनेमातील धमाकेदार गाणे आणि त्या गाण्यावरील शानदार डान्स सर्वांनाच भावला होता. या सिनेमातील मेरा दिल ना तोडो हे गाणं तर चांगलंच गाजलं होतं. करिश्मा कपूरला मोहित करण्यासाठी गोविंदाने हा डान्स केला जो लोकांना इतका आवडला होता की, आजही गोविंदाचं हे गाणं लोकांच्या ओठावर आहे. यानंतर आता 25 वर्षांनंतर या गाण्यावर गोविंदाने पुन्हा डान्स केला आहे. यावेळी गोविंदासोबत माधुरीही थिरकताना दिसत आहे. या दोघांनी जेव्हा डान्सची जुगलबंदी केली तेव्हा सगळे त्यांना पहातच राहिले होते.

गोविंदा आणि माधुरी दीक्षित यांची जोडी अनेक सिनेमात दिसली आहे. आता अनेक वर्षांनंतर हे दोघे एकत्र आले आहेत त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. गोविंदा आणि माधुरीचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

https://www.instagram.com/p/BzfqkhQB66A/?utm_source=ig_embed

हा व्हिडीओ एका डान्स रिअ‍ॅलिटी शो डान्स के दीवानेमधील आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, गोविंदाने राजा बाबू सिनेमातील गाण्यावर धमाकेदार एंट्री केली आहे. गोविंदाला स्टेजवर थिरकताना पाहून माधुरी दीक्षितही त्या गाण्यावर थिरकण्यापासून स्वत:ला आवरू शकली नाही. गोविंदा नव्याने डान्स करतानाही आपल्या जुन्या अंदाजात दिसत आहे. असे समजत आहे की, हा व्हिडीओ जुनाच आहे परंतु नव्याने व्हायरल होताना दिसत आहे.

गोविंदा आणि माधुरीची जोडी 90 च्या दशकातील सर्वात हिट जोडींपैकी एक आहे. या दोन्हीही सुपरस्टार्सने अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे. त्यांनी एकत्र काम केलेले, बडे मिया छोटे मिया, इज्जतदार आणि महासंग्राम असे अनेके त्यांचे सिनेमे सांगता येतील. अनेक वर्षांनी आपल्या आवडत्या जोडीला एकत्र पाहिल्याने चाहतेही खूप खुश आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

जाणून घ्या आरोग्यवर्धक खजुराचे ‘फायदे’

सिने जगत

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाच्या ‘हॉट’नेसचा सोशलवर ‘बोलबाला’ !

बहुजननामा

या दिवशी औरंगाबादमध्ये पार पडणार अण्णाभाऊ साठे काव्यवाचन स्पर्धा

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे