आवडीचे चॅनेल निवडले म्हणून टीव्ही झाला बंद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ट्रायच्या नियमानुसार ३१ जानेवारीपर्यंत आपल्या आवडीचे चॅनेल निवडण्याची मुदत देण्यात आली होती. नको असलेल्या चॅनेलचे पैसे लोकांना भरावे लागत असल्याने ट्रायने चॅनेल निवडण्याचे स्वतंत्र टीव्ही ग्राहकांना दिले होते. त्या नवीन नियमानुसार ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडायचे होते. परंतु ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडल्याने ग्राहकांचे टीव्ही बंद झाल्याची घटना घडली आहे.

ट्रायने ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडण्याची सवलत दिली असून जे चॅनेल ग्राहक निवडणार आहेत तेवढ्याच चॅनेलच्या पैशाचा भरणा ग्राहकांना करणार आहेत. त्याच प्रमाणे ३१ जानेवारी पर्यंत चॅनेल निवड करण्याची मुदत देण्यात आली होती. ग्राहकांनाही जे चॅनेल निवडले होते ते सर्व चॅनेल बंद झाल्याचे सत्य पुण्यात उघडकीला आले आहे. तर ज्या लोकांनी चॅनेल निवडले नाहीत त्या ग्राहकांचे टीव्ही हे पूर्वीच्या पॅक नुसार सुरु राहणार आहेत. तर मनपसंत चॅनेल निवडून हि टीव्ही बंद पडल्याने लोकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही लोकांनी या संदर्भात कस्टमर केअरशी संपर्क केला असता तुमचा टीव्ही पुढील ४८ तास बंद राहील असे अजब सत्य त्या ग्राहकांना ऐकायला मिळाली आहे.

“ट्रायच्या नियमानुसार मी माझ्या केबल चालकाशी संपर्क साधून आमच्या कुटुंबियांच्या आवडीचे चॅनेल निवडले. परंतु आज सकाळपासून माझ्या टीव्हीचे सर्व चॅनेल बंद झाले आहेत. कस्टमर केअरला फोन लावून याबाबतची विचारणा केली असता पुढील ४८ तास तुमचे टीव्ही चॅनेल सुरु होणार नाहीत असे सांगण्यात आले” अशी माहिती एका त्रस्त ग्राहकाने दिली आहे.