हीना खानच्या रेड बिकिनीतील Hot अवतारामुळं सोशल मीडियाचा पारा ‘गरम’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीव्ही इंडस्ट्रीत धमाल करणारी अभिनेत्री हीना खान (Hina Khan) नेहमीच चर्चेत येत असते. हीना खान सोशलवर कायमच अ‍ॅक्टिव दिसत असते. अलीकडेच हीना आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत आली होती. हीनाचे हॉट लुकवाले फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी हीनानं बोल्ड बिकिनी घालून साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हीनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात हीना खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला आहे. तिचा कडक अंदाज पाहून चाहते पुन्हा एकदा अवाक् झाले आहेत. बोल्ड बिकिनी घालून समुद्रकिनारी पोज देणारी हीना खूपच कातिल दिसत आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं रेड बिकिनी घातली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हीनाचे हे फोटो मालदीवमधील आहेत.

चाहत्यांनी हीनाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि तिचं कौतुक केलं आहे.

हीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती झी 5 वरील अनलॉक या सीरिजमध्ये काम करताना दिसली. 27 जून 2020 रोजी ही सीरिज रिलीज झाली होती. तिनं डॅमेज 2 या सीरिजमध्ये काम केलं आहे. हीनानं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हीना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती. हीना बिग बॉस 14 मध्येही सीनियर कंटेस्टेंट म्हणून सहभागी झाली होती. ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.