Indian Idol 12 : सवाई भटच्या गरीबीबद्दल बोललं गेलं खोटं ! जुन्या फोटोंनी उपस्थित केले प्रश्न

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  इंडियन आयडल (Indian Idol) चा सध्या 12 वा सीजन सुरू आहे. यात आलेले गायक सध्या आपल्या आवाजानं चाहत्यांचं मन जिंकत आहे. यातच राजस्थानच्या सवाई भट (Sawai Bhatt) ची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे जो सध्या खूप अटेंशन घेत आहे. अनेकजण त्याचे फॅन झाले आहेत.

सवाई भटच्या आवाजा सोबतच त्याच्या स्ट्रगलची स्टोरीही लोकांना खूप प्रभावित करते. परंतु आता सवाईच्या संघर्षाच्या कहाणी सोबत एक वाद जोडला गेला आहे. सवाईचे काही जुने फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत. त्यामुळं आता शोमध्ये त्यानं केलेल्या गरीबीच्या त्याच्या दाव्यावर सवाल केले जात आहेत. शोच्या सुरुवातीला सवाईबद्दल असा दावा केला जात होता की, तो खूपच गरीब कुटुंबातून आला आहे. ज्यामुळं सिंगर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला खूप संघर्षाचा सामना करावा लागला होता.

परंतु सध्या सवाईचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यात सवाई एका लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये गाताना दिसत आहे. यानंतर असं बोललं जात आहे की, सवाईची आर्थिक स्थिती तेवढीह खराब नाहीये जेवढी सांगितली जात होती. आता फक्त सवाईच नव्हे तर शोच्या मेकर्सवरही सवाल केले जात आहेत.

काही युजर्सचं तर असं म्हणणं आहे की, शोच्या टीआरपी साठी मेकर्सनी सवाईला गरीब दाखवण्याचं काम केलंय. युजर्सनुसार, सवाईला एक ट्रॅडिशनल सिंगर म्हणून इंट्रोड्युस करण्यात आलं होतं, परंतु तो तर एक प्रोफेशनल सिंगर आहे. त्यानं सिंगिगचं ट्रेनिंगही घेतलं आहे. या सोबतच सोनू निगमचा एका मुलाखतीचा व्हिडीओ देखील सध्या चर्चेत आहे. ज्यात त्यानं शोची पोलखोल केली होती.