India’s Best Dancer : ‘या’ अपंग स्पर्धकानं केलं ‘असं’ काही, परीक्षकांनी सोडली खुर्ची (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – इंडियाज बेस्ट डान्सर या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सध्या देशाच्या काना-कोपऱ्यातून डान्सर्स येताना दिसत आहेत. ऑडिशनदरम्यान अनेक डान्सर्सनी आपल्या डान्सनं जजेसला खुश केलं आहे. परंतु शोमध्ये असा एक डान्सर होता जो फिजीकली चॅलेंज्ड होता. तरीही त्यानं आपल्या डान्सनं सर्वांनाच चकित केलं.

हा स्पर्धक पटन्यातील असून एक फिजीकली चॅलेंज्ड आहे. 29 फेब्रवारीला त्याचा हा एपिसोड समोर आला होता. आपल्या टॅलेंटनं त्यानं फक्त परीक्षकांनाच नाही तर पूर्ण जगाला हैराण केलं. सोनी टीव्हीनं इंस्टावरून या स्पर्धकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या स्पर्धकाचं नाव आहे सुरज वर्मा. प्रेक्षकांना सुरजचा डान्स एवढा आवडला आहे की, ते वारंवार सुरजचा डान्स पहात आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, एबीसीडी 2 या सिनेमातील चूनर या गाण्यावर सुरज डान्स करतो आहे. सादरीकरण करण्याआधी सुरज म्हणतो, “मी कोणापेक्षाही कमी नाही आणि आज मी हे सिद्ध करूनच जाईल. आज मी स्टेजवर आग लावणार आहे.” त्यानं डान्सला सुरुवात करताच गीता कपूर, मलायका अरोरा आणि टेरेंस लुईस असे तीनही परीक्षक खूप इमोशनल होतात. त्याचा डान्स संपताच तिघंही त्याया स्टँडिंग ओवेशन देतात.