जॅकलीन फर्नांडिसनं शेअर केलं ‘मेरे अंगने में’ गाण्याचं नवं पोस्टर, ‘या’ दिवशी रिलीज होणार साँग

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 चा रनरअप आसिम रियाज लवकरच एका म्युझिक व्हिडीओत दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नांडिस ही देखील दिसणार आहे. हे गाणं 8 मार्च 2020 रोजी म्हणजेच उद्याच (रविवार) रिलीज होणार आहे. याआधीही जॅकनं या गाण्याचे काही पोस्टर शेअर केले होते.

https://www.instagram.com/p/B9bMyJPnzBa/?utm_source=ig_embed

समोर आलेल्या पोस्टरमध्ये जॅकलीन भारतीय वेशभुषेत दिसली होती. तिचा मात्र दिसत नाहीये. कारण ती पाठमोरी उभी आहे. याआधीही आसिम आणि हिमांशी यांनी इंस्टा स्टोरीवर बुमरॅंग व्हिडीओ शेअर केलं होतं. यात दोघंही डान्स प्रॅक्टीस करताना दिसले होते. जॅकलीननं स्पोर्ट्स ड्रेपरी घातली होती तर आसिम पिवळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्टमध्ये दिसला होता. आसिमनं बूमरँग व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शनही दिलं होतं.

रिपोर्टनुसार, हे एक लोकगीत आहे. हे गीत तनीष्क बागचीनं कंपोज केलं आहे. सिंगर नेहा कक्करनं या गाण्याला आवाज दिला आहे. मेल व्हाईस राजा हसननं दिला आहे. राधिका राव आणि विनय सप्रु यांनी हे मिळून हे डायरेक्ट केलं आहे. वायु यानं हे गाणं लिहिलं आहे.

https://www.instagram.com/p/B9RZUVTHeHY/?utm_source=ig_embed

याव्यतिरीक्त आसिम आणखी एका म्युझिक व्हिडीओत हिमांशी खुराना सोबत दिसणार आहे. या गाण्याची सिंगर देखील नेहा कक्कर आहे. हे गाणं 18 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B9Q_sU5Hd8A/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B9O7AK-JQ8J/?utm_source=ig_embed