अभिनेत्री जसलीन मथारू आणि तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची ‘धमकी ! पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बिग बॉस 12 ची स्पर्धक जसलीन मथारू अलीकडेच मुझसे शादी करोगे या पारस छाबडाच्या शोमध्ये आली होती. परंतु ती पारस छाबडा सोबत लग्न करू शकली नाही. याचे कारण म्हणजे ती शोमधून बाहेर पडली आहे. पंरतु जेव्हापासून ती शोमधून बाहेर पडली आहे तेव्हापासून ती आणि तिचं कुटुंब वैतागलेलं दिसत आहे.

जसलीन मथारूचे वडिल केसर मथारू यांना अलीकडेच धमकीचा कॉल आला होता. यानंतर ते खूपच तणावात दिसत आहेत. एका इंग्रजी वृत्तानुसार, ज्या व्यक्तीनं केसर मथारूंना धमकी दिली आहे त्यांनी त्यांना एक ठराविक रक्कमही मागितली आहे. जर पैसे दिले नाहीत तर तुझ्या कुटुंबाला ठार करेन अशी धमकीही त्यांना देण्यात आली आहे.

जसलीनचे वडिल केसर यांनी सांगितलं की, “सतत येणाऱ्या या फोन कॉल्समुळं त्यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी बिल्डींगची सिक्योरिटीही चेक केली होती. त्यांनी असंही सांगितलं की, त्यांना हा ठार मारण्याच्या धमकीचा कॉल एकदा नाही तर अनेकदा आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर जसलीन प्रचंड घाबरली असून तिनं स्वत:ला घरात बंद केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.