लाल चोळी, ओढणी अन् श्रृंगार करून निघाली जसलीन मथारू ! लोक म्हणाले ‘लेहंगा तर घाल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा शो बिग बॉस 12 ची स्पर्धक जसलीन मथारू (Jasleen Matharu) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जसलीनचा एक व्हिडिओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. परंतु यामुळं ती ट्रोलही होत आहे.

जसलीननं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिनं लाल चोळी, ओढणी परिधान केल्याचं दिसत आहे. याशिवाय तिनं ज्वेलरी, मेकअप आणि पूर्ण श्रृंगार केला आहे. परंतु लेहंगा किंवा घागऱ्याऐवजी तिनं शॉर्ट हॉटपँट घातली आहे. अशाच लुकमध्ये ती कॅमेऱ्यासमोर अदा दाखवत चालताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CHnMWUNnLrK/?utm_source=ig_embed

व्हिडिओ शेअर करताना जसलीन म्हणते, मी चालले सासरी. जसलीनचा हा व्हिडिओ समोर येताच प्रचंड व्हायरल होताना दिसला. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

परंतु आपल्या आउटफिटमुळं जसलीनला काहींनी ट्रोल केलं आहे. काहींनी तिला लेहंगा घालण्याचा सल्लाही दिला आहे. सोबत इतरही अनेक नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.

जसलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच अशी माहिती समोर आली होती की, जसलीन आणि अनुप जलोटा एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. वो मेरी स्टुडेंट है असं या सिनेमाचं नाव आहे .

You might also like