अभिनेत्री ‘काम्या पंजाबी’नं बिकीनीत पोज देत दाखवले ‘टॅटू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या अनेक सेलेब्रिटीज व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. सुपरहहिट मालिका ‘शक्ति : अस्तित्व के एहसास’ मध्ये दिसणारी टीव्ही अ‍ॅक्ट्रेस काम्या पंजाबी सध्या आपला बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. काम्याने याच व्हॅकेशनचे काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत. बिकीनी घालून काम्या आपली फिट बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे.

काम्याने फोटो शेअर करताना हेदेखील सांगितलं आहे की, तिच्या शरीरावर दिसणारी प्रत्येक खुण काहीतरी कथा सांगत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये काम्या म्हणते, “माझे शरीर कॅनव्हाससारखे आहे, त्यावरील प्रत्येक खूण मला याची आठवण करून देते की मी किती धाडसी आहे आणि त्यासाठी मला काय किंमत मोजावी लागली आहे.

प्रत्येक बिंदू जो मी यापूर्वी माझ्या वेडेपणात लपविण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रत्येक वेळी बदलणारे वजन, जे माझ्या मुलाने किंवा कधीकधी माझ्या खाण्याने वाढवले होते. या कॅनव्हासचा मला अभिमान आहे आणि मी भविष्यात येणाऱ्या नवीन चित्रकलेची आतुरतेने वाट पाहत आहे.”

काम्या या हॉट फोटोवर तिचा बॉयफ्रेंड शलभनेही कमेंट करत म्हटलं आहे की, “मुझे तुम पर गर्व है मेरे प्‍यार.” काम्याच्या शरीरावर अनेक खुणा दिसत आहेत. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. शलभ डॉक्टर आहे आणि एका मुलाचा बाप आहे. काम्या अगदी 16 वर्षांच्या मुलीसारखी त्याच्या प्रेमात पागल आहे.

Visit : Policenama.com