कपिल शर्मानं ‘अशा’ अंदाजात साजरा केला लाडक्या ‘अनायरा’चा फर्स्ट बर्थडे ! शेअर केले खास फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि गिनी चतरथ (Ginni Chatrath) यांची मुलगी अनायरा शर्मा (Anayra Sharma) 10 डिसेंबर रोजी (वार गुरुवार) 1 वर्षांची झाली आहे. खूप धामधुमित अनायराचा वाढदिवस साजरा करण्यात आला ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

कपिलनं त्याच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तो अनायराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, अनायरा कधी केक न्याहाळताना दिसत आहे तर कधी केक कापताना दिसत आहे. फोटो शेअर करताना त्यानं खास मेसेजही दिला आहे.

अनायराचे फोटो शेअर करताना कपिलनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, आमच्या लाडोला पहिल्या वाढदिवशी तिला प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद. गिनी आणि कपिल. कपिलनं त्याच्या इंस्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. यात अनायरा केक खाताना दिसत आहे.

अनायराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहते यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी भरभरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांना तिचा क्युट अंदाज खूप आवडला आहे.