शेतकरी आंदोलनावर बोलल्यानंतर ट्रोल झाला कपिल शर्मा ! कॉमेडियननं दिलं जोरदार ‘प्रत्युत्तर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) सोशलवर कायमच आपलं मत मांडत असतो. आज कपिलनं शेतकरी आंदोलनावर एक ट्विट केलं. परंतु यानंतर त्याला कॉमेडी करण्याचा आणि राजकारणात न घुसण्याचा सल्ला दिला जाऊ लागला. कपिलनंही ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिलं.

काय म्हणाला होता कपिल ?
आपल्या ट्विटमध्ये कपिलन लिहिलं होतं की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना राजकीय रंग न देता बातचित करत या प्रकरणी मार्ग काढला जावा. कोणताच मु्द्दा एवढा मोठा नसतो की, तो बातचित करून सोडवला जाऊ शकत नाही. आम्ही सर्व देशवासी शेतकरी बंधूंसोबत आहोत. ते आमचे अन्नदाते आहेत.

कपिलचं हे ट्विट समोर आल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. एकानं लिहिलं की, कॉमेडी कर चुपचाप, राजकारण करण्याचा प्रयत्न करू नकोस. जास्त शेतकरी मित्र बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझं जे काम आहे त्यावर फोकस कर.

कपिलनं त्याला जोरदार उत्तर दिलं. कपिलनं लिहिलं की, मी माझं काम करतच आहे. कृपया तुम्हीही करा. देशभक्त लिहिल्यानं कोणी देशभक्त होत नाही. काम करा आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्या. 50 रुपयांचा रिचार्ज करून फालतूचं ज्ञान नका वाटू.

 

 

You might also like