‘भारती’वरून यूजरनं केली कपिल शर्मावर टीका ! कॉमेडियननं दिलं प्रत्युत्तर पण लोकांनी केलं ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) कॉमेडियन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsa Limbachiyaa) यांना अटक केली होती. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) किला कोर्टानं भारती आणि हर्ष यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता. ज्यावर आज (सोमवार दि. 23 नोव्हेंबर) सुनावणी झाली. या सुनावणीनंतर आता भारती आणि हर्ष यांचा जामीन एनडीपीएस कोर्टानं मंजूर केला. ड्रग केसमध्ये नाव आल्यानंतर भारतीनंतर काही लोक कॉमेडियन कपिल शर्मावरदेखील टीका करू लागले. अशातच एका यूजरनं कपिलवर टीका करणारं ट्विट केलं, ज्याला कपिलनंही उत्तर दिलं. परंतु त्यानंतर कपिल पुन्हा ट्रोल होऊ लागला.

एकानं ट्विट करत लिहिलं की, भारतीचे कसे हाल झाले. जोपर्यंत पकडली जात नाही तोवर ड्रग्स नव्हती घेत. तसंच तुमचं आहे बहुतेक, जोपर्यंत पकडले जात नाही.

असं ट्विट पाहिल्यानंतर कपिलनं त्याला उत्तर देत लिहिलं की, आधी आपल्या साईजचा शर्ट शिवून घे जाड्या. या कमेंटनंतर कपिल जास्तच ट्रोल होऊ लागला.

अनेकांनी कपिलवर टीका करत म्हटलं की, कपिल आता बॉडी शेमिंगवर उतरला आहे. ट्रोलर झाल्यानंतर कपिलनं ते ट्विट डिलीट केलं.

You might also like