‘कार्तिक-सारा’चा रिअल ‘लव आज कल’ वरून कपिल शर्मानं काढला ‘चिमटा’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या लव आज कल 2 या सिनेमाच्या शुटींमध्ये व्यस्त आहेत. सिनेमा रिलीज व्हायला अद्याप वेळ आहे. असं असतानाच चाहत्यांनी त्यांना सारतिक असं नाव दिलं आहे. शुटींगदरम्यान कार्तिक आणि साराच्या जवळीकतेबद्दल अनेक बातम्या समोर येताना दिसल्या होत्या. असे असतानाच आता प्रमोशनदरम्यान त्यांच्या रिअल लव आज कल वर बरेच प्रश्न उपस्थित केले जाताना दिसत आहेत. कपिल शर्मानंही त्यांना यावरून चिमटा काढला आहे.

सारा आणि कार्तिक सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये येणार आहेत. या शोदरम्यान कपिल सारा आणि कार्तिकच्या लव स्टोरीवरून त्यांना छेडताना दिसत आहे.

सारा आणि कार्तिक जेव्हा शोमध्ये एन्ट्री करतात तेव्हा कपिल म्हणतो, सारा कार्तिक काय जोडी दिसत आहे कमाल एकदम. कसं चाललंय तुमचं लव आज कल…चं प्रमोशन” कपिलच्या या वाक्यानंतर सर्वच जोरात हसू लागतात.

https://www.instagram.com/p/B8N0i_6B62z/?utm_source=ig_embed

कपिल कार्तिककडे पहात म्हणतो, “कार्तिक सिनेमात जे रोमँटीक सीन करत आहे, खूप कमालची केमिस्ट्री वाटत आहे. अच्छा कार्तिक तू डायरेक्टरचं ऐकत होतास की, हे सगळं नॅचरलीच बाहेर येत होतं.”हे ऐकल्यानंतर शोमधील उपस्थित सर्वच हसू लागतात. सारादेखील कार्तिककडे पहाते की, तो आता काय उत्तर देईल. कार्तिक कपिलला उत्तर देताना म्हणतो, “सर मी नॅचरल अॅक्टर आहे.” इतकेच नाही तर या शोमध्ये कार्तिक अर्चना पूरण सिंहला उचलून घेताना दिसणार आहे.