TV सीरियल ‘कसौटी जिंदगी कि’चा मुख्य अभिनेता पार्थ समथान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकप्रिय टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी कि’ मध्ये अनुराग बासूची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथानला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान तोही डिप्रेशनचा बळी ठरल्याचे त्याने उघड केले होते. या वेळी त्याच्या मनात अनेक नकारात्मक विचार येत होते. ज्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. पार्थ समथानने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे डिप्रेशनविरूद्धच्या त्याच्या लढ्याविषयी उघडपणे भाष्य केले. आता तो कोरोना संक्रमित झाला आहे.

लॉकडाऊन दरम्यान आपण डिप्रेशनचा शिकार झाल्याचे उघडकीस आणून अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की – ‘मी माझ्या मित्रांचे, चाहत्यांचे आणि त्या सर्व प्रेम करणाऱ्या लोकांचा आभारी आहे, ज्यांनी मला एक सकारात्मक आणि चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली. आपणा सर्वांचे मनापासून आभार.’ पोस्टसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘हो, लॉकडाऊन दरम्यान मला नैराश्य आणि काही दुःखद घटनांचा सामना करावा लागला. परंतु, हे असे क्षण आहेत, जे आम्हाला मजबूत करतात आणि पुढे जाण्यात मदत करतात. जेणेकरून, ही महामारी संपल्यानंतर आपण पुन्हा जगाचा सामना करण्यास तयार होऊ.

 

https://www.instagram.com/the_parthsamthaan/?utm_source=ig_embed

 

दरम्यान, नुकतेच निर्माता विकास गुप्ता यांच्या आरोपांमुळे पार्थ समथान चर्चेत आला आहे. विकास गुप्ता यांनी पार्थ समथानवर आरोप केला की, तो मानसिक मानसिक छळ करीत आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना विकास गुप्ता यांनी आपला बाइसेक्शुअल असल्याचे उघडकीस आणताना प्रियंक शर्मा आणि पार्थ समथानवर आरोप होते आणि दोघांचे प्रेमसंबंध होते. यासह, या दोघांवर आरोप करताना त्यांनी असेही म्हटले की – ‘मी आता दबावात येणार नाही. प्रियंका शर्मा आणि पार्थ समथान यांनी मला हे सत्य सार्वजनिकरित्या स्वीकारण्यासाठी प्रेरित केले, त्याबद्दल दोघांचेही आभार.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like