‘प्रायव्हेट पार्ट’चे फोटो पाठवायचा विकृत माणूस, अभिनेत्रीची पोलिसांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने (Kavita Kaushik) एका इसमाविरोधात तो सोशल मीडियावरून (Social Media) सातत्याने अश्लील फोटो पाठवत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे कंटाळून तीने सायबर क्राईम (Cybercrime )अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तिने असा आरोप केला आहे की, तो माणूस सतत तिला सोशल मीडियावर त्याचे अश्लील फोटो पाठवत असे. संबधित आरोपीला लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी तीने केली आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून तिचा राग व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईलचा फोटो शेअर करत तिने त्याला जगासमोर आणले आहे. कवितांच्या या तक्रारीबाबत लवकरच कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांकडून दिली जात आहे.

एक स्क्रीनशॉट शेअर करत तिने असे म्हटले आहे की, शंकर नावाची ही व्यक्ती त्याच्या प्राइव्हेट पार्ट्सचे फोटो सेलिब्रिटींना पाठवत आहे. विचार करा कमी प्रिव्हिलेज असणाऱ्या मुलींना त्याच्यापासून किती धोका आहे. कुणाला यामुळे वाईट कसे नाही वाटले आणि तो कुठे राहतो हे शोधून त्याच्या घराबाहेर नारे लावावेसे नाही का वाटले. कविता कौशिकने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यात तिने राष्ट्रीय महिला आयोग, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केले आहे. कविता नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध सामाजिक मुद्द्यावर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असते. सध्या कविता बिग बॉस सीझन 14 मध्ये स्पर्धक बनेल अशा चर्चा आहे. काही मीडिया अहवालानुसार ती शो मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊ शकते. कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.

You might also like