कविता कौशिकच्या पतीचा अभिनव शुक्लावर गंभीर आरोप ! म्हणाला- ‘दारूच्या नशेत त्यानं मध्यरात्री माझ्या पत्नीला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस कविता कौशिक (Kavita Kaushik) बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) बाहेर पडली आहे. रुबिना दिलैक (Rubina Dilaik) सोबत झालेल्या जोरदार भांडणानंतर रागात तिनं बिग बॉसचं घर सोडलं होतं. कविता रुबिनाला म्हणाली होती की, तिला तिच्या पतीचं सत्य माहीत आहे का. घरातून बाहेर पडल्यानंतर ती तिच्या पतीचं सत्य सर्वांना सांगेल, असंही कविता म्हणाली होती.

घरातून बाहेर पडल्यानंतर कवितानं तरी अद्याप अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) बद्दल काहीही वक्तव्य केलेलं नाही. परंतु कविताचा पती रोनित बिस्वास (Ronit Biswas) यानं नक्कीच अभिनवबद्दल चकित करणारे खुलासे केले आहेत.

रोनितनं त्याच्या ट्विटरवरून एक ट्विट करत लिहिलं आहे की, आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे. टीव्हीवर दिसणारा हा माणूस काही जेंटलमन नाही. त्याला अल्कोहोल घेण्याची वाईट सवय आहे. नशेत धुत्त होऊन तो मध्यरात्री केके (कविता कौशिक) ला मेसेज करायचा. तिच्या सोबत बोलण्याचा आणि मध्यरात्री तिला भेटण्याचा हट्ट करत होता. याव्यतिरिक्त आणखी बरंच काही असं आहे जे सांगितलं जाऊ शकतं. याला परेशान होऊन माझ्या पत्नीनं अनेकदा पोलिसांना बोलवलं आहे.

https://twitter.com/ronnitb/status/1334430035546017799?s=20

आणखी एका ट्विटमध्ये रोनित म्हणतो, हा तोच माणूस आहे ज्यानं आमच्याकडे भीक मागितली होती. कारण त्याला आमच्या घरात शूटिंग करायची होती. हा तोच सिनेमा आहे जो आम्ही फ्रीमध्ये केला होता आणि आमचं घरही दिलं होतं. आणि आता तो याच लेडीला म्हणत आहे की, तिला मारेन ? मर्द ? खरंच ?

https://twitter.com/ronnitb/status/1334430037420900353?s=20