KBC 12 : ‘महाभारत’बद्दल आहे ‘केबीसी’चा 11 वा प्रश्न, ‘हे’ आहे योग्य उत्तर, ‘अशी’ आहे उत्तर पाठवण्याची प्रक्रिया ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचा शो कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीजनची सर्वजण आतुरतेनं वाट पहात आहेत. अलीकडेच याच्या रजिस्ट्रेशनलाही सुरुवात झाली आहे. यात प्रेक्षकांना रोज एक प्रश्न विचारला जात आहे. यातून योग्य उत्तर देऊन तुम्ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसू शकता. जर तुम्ही अद्याप रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही आता 11 व्या प्रश्नाचं उत्तर देऊन केबीसीच्या मंचावर पोचू शकता.

सोनी टीव्हीच्या ट्विटर अकाऊंटवरून रोज एक व्हिडीओ शेअर केला जातो. यात अमिताभ बच्चन प्रेक्षकांना प्रश्न विचारताना दिसतात. आतापर्यंत त्यांनी 10 प्रश्न विचारले आहेत. यानंतर आता 11 वा प्रश्न समोर आला आहे. हा प्रश्न टीव्ही सुरू असणारी मालिका महाभारतबद्दल आहे.

हा आहे 11 वा प्रश्न

मुकेश खन्ना यांनी बीआर चोपडांच्या महाभारत मालिकेत कोणती भूमिका साकारली होती ?

A. अर्जुन

B. भगवान कृष्ण

C. भीष्म

D. भीम

याचं योग्य उत्तर आहे C. भीष्म.

या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 20 मे म्हणजेच आज रात्री 9 वाजण्याच्या आत देणं अनिवार्य आहे. तुम्ही एसएमएस किंवा सोनी लाईव्ह अ‍ॅपच्या माध्यमातून देऊ शकता. एसएमएसच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी KBC{space} तुमचं उत्तर (A,B,C,D) {space} तुमचं वय {space} लिगं (पुरुष असेल तर M, स्त्री असेल तर F आणि इतरसाठी O) लिहून 509093 वर पाठवा. ज्याचं उत्तर योग्य असणार आहे त्याला कंप्युटरद्वारे निवडलं जाणार आहे आणि पुढील राऊंडसाठी आमंत्रित केलं जाणार आहे.