19 वर्षांपूर्वी KBC मध्ये 1 कोटी जिंकणारा मुलगा आता बनला IPS ! जाणून घ्या कुठे झाली ‘पोस्टींग’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2001 मध्ये केबीसी ज्युनियर आलं होतं. 14 वर्षांपूर्वी आलेल्या या शोमध्ये रवी मोहन सैनी नावाच्या एका मुलानं 15 प्रश्नांची अचूक उत्तर देत 1 कोटी रुपयांचं बक्षिस जिंकलं होतं. खास बात अशी की, तोच मुलगा आता आयपीएस अधिकारी बनला असून त्यानं पहिली पोस्टींगही घेतली आहे.

रवी मोहन सैनी आता 33 वर्षांचे आहेत. त्यांनी गुजरातच्या पोरबंदरमध्ये एसपी म्हणून जॉईन केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना त्यांनी सांगितलं की, महात्मा गांधी मेडिकल कॉलेज जयपूरमधून त्यांनी एमबीबीएस केलं. यानंतर इंटर्नशिप करतानाच त्याची निवड सिव्हील सर्व्हिसेसमध्ये झाली. त्यांचे वडिल नेवी आहेत आहेत त्यांनाच प्रभावित होऊन आयपीएसची निवड केली.

भारतीय पोलीस सर्व्हीसेससाठी सैनी यांची निवड 2014 मध्ये झाली होती. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर 461 वी रँक मिळवली होती. त्यांनी आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की, कॉविड 19 बद्दल विचार करता पोरबंदरमध्ये लकडाऊनचं पालनं करवून घेण्याची त्यांची प्राथमिकता आहे.

KBC 12 च्या पहिल्या प्रश्नाला जबरदस्त प्रतिसाद
लवकरच केबीसीचा 12 वा सीजन सुरू होणार आहे. सोनी लिव अ‍ॅपवरून प्रश्नही विचारले गेले आहेत. यावेळी सर्व काही ऑनलाईन आहे. पहिल्याच प्रश्नासाठी 2.5 मिलियन म्हणजेच 25 लाख एन्ट्रीज आल्या आहेत.