Khatron Ke Khiladi 10 : ‘टास्क’दरम्यान ‘या’ अभिनेत्रीच्या कानात गेलं झुरळ अन्…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रोहित शेट्टी होस्ट करत असलेला खतरों के खिलाडी 10 हा रिअ‍ॅलिटी शो लवकरच सुरू होणार आहे. रोहित शेट्टीनं सांगितलं आहे की यावेळी स्पर्धकांचा खतरा दुप्पट होणार आहे. याचाही अंदाज तेव्हा आला जेव्हा शोची स्पर्धक अदा खाननं तिला आलेला खतरनाक अनुभव सांगितला. एका टास्कदरम्यान अदा खानच्या कानात झुरळ घुसलं होतं.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अदानं खतरों के खिलाडी 10 मध्ये घडलेल्या भयानक घटनेचं वर्णन केलं आहे. अदा खान म्हणाली, “मला शो दरम्यान कोणतीही मोठी इजा तर नाही झाली परंतु एका टास्कदरम्यान माझ्या कानात झुरळ घुसलं होतं. मला कळतंच नव्हतं की, खरंच कानात झुरळ गेलंय की, मला भास होत आहे. मला त्या रात्री झोपच आली नाही कारण कानात गेलेल्या त्या झुरळाची हालचाल सुरू होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा माझ्या कानातून एक झुरळ बाहेर आलं.” अदाचा अनुभव ऐकून सारेच अवाक् झाले.

शोबद्दल बोलायचं झालं तर रोहित शेट्टीनं होस्ट केलेला खतरों के खिलाडी 10 हा शो बुलगरियामध्ये शुट केला आहे. यावेळी खतरों के खिलाडीच्या मेकर्सनं स्पर्धकांसाठी एकापेक्षा एक टास्क ठेवले आहेत. बिग बॉस 13 च्या फिनालेमध्ये या शोच्या खतरनाक टास्कची एक झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. रोहित शेट्टीचा हा शो 22 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.

 

 

You might also like