कॉमेडीयन कृष्णा अभिषेकनं सांगितलं मामा गोविंदा सोबत शूट न करण्याचं कारण ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कॉमेडीयन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याचा मामा व बॉलिवूड स्टार गोविंदा (Govinda) यांच्यात सुरू असलेला वाद आता सर्वांनाच माहिती झाला आहे. गेल्या वर्षी गोविंदा पत्नीसह द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये आला होता. त्यावेळी कृष्णाच्या अनुपस्थितीमुळं अनेक सवाल समोर केले जात होते. यावेळी अलीकडेच गोविंदा पुन्हा शोमध्ये आला तेव्हा तेव्हा कृष्णा पुन्हा गायब होता. कृष्णानं सांगितलं होतं की, मामा गोविंद सेटवर येणार आहे हे कळाल्यानंतर त्यानं एपिसोडपासून स्वत:ला वेगळं केलं होतं.

आता कृष्णानं असं करण्यामागील कारण सांगितलं आहे. कृष्णाच्या मते त्याचं गोविंदावर खूप प्रेम आहे. सध्या त्यांच्यात झालेल्या वाकयुद्धानंतर जर तो मामा समोर आला असता, तर त्याला आपले अश्रू अनावर झाले असते. त्यामुळं त्यानं निर्णय घेतला होता की, त्या एपिसोडचा हिस्सा बनणार नाही ज्यात त्याचा मामा गोविंदा येणार आहे. कृष्णानं हेही सांगितलं की, काही दिवसात दोघांमधील अंतर खूप वाढलं आहे. ज्यामुळं तो खूप दुःखी आहे.

https://www.instagram.com/archanapuransingh/?utm_source=ig_embed

 

याआधीही कृष्णानं सांगितलं होतं की, गेल्या वर्षी त्याची मामी आणि गोविंदाची पत्नी सुनीता हिला तिच्यासमोरील त्याच्या सादरीकरणापासून अडचण होती. म्हणून त्यानं त्या एपिसोडपासून स्वत:ला वेगळं केलं होतं. परंतु यावेळी जेव्हा गोविंदा पुन्हा पत्नीसह शोमध्ये आला होता तेव्हा कृष्णाला गोविंदा समोर सादरीकरण करायला अडचण होती. त्यामुळं त्यानं दिवाली स्पेशल एपिसोडमधून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. कारण यात गोविंदा आला होता. कारण त्याच्यासमोर सादरीकरण कृष्णासाठी सोपं नव्हतं.

You might also like