COVID-19 : ‘रोडीज’चा जज रघु रामच्या मित्राचं ‘कोरोना’मुळं निधन ! शेअर केली ‘इमोशनल’ पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रोडीजचा जज रघु राम याच्या मित्रचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. रघुनं इंस्टावर एक इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. रघुला मित्राच्या जाण्यानं खूप दु:ख झालं आहे.

इंस्टावरून एक इमोशनल पोस्ट आणि एक फोटो शेअर करत रघु म्हणतो, “काल रात्री मी तुला कॉविड 19 मुळं गमावलं अब्दुल. जो दु:ख आणि त्रास मला आता होत आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत. 2009 मध्ये राजू ड्रायवर बनून तू माझ्या आयुष्यात आलास. परंतु तू अब्दुल रउफ होतास. हे कळल्यावर मी चकित झालो होतो. एक इमानदार प्रेमळ आणि मेहनती मित्र ज्याची काही स्वप्न होती आणि ती पूर्ण करण्याची ताकदही होती.”

View this post on Instagram

I lost you last night to Covid 19, Abdul. The grief I feel is indescribable, just like that of anyone who ever knew you. You came into my life in 2009 as Raju, my driver. But you surprised me with who you really were. You were Abdul Rauf. A loving, honest, competent, hard working friend who had dreams, and the courage to go after them. You worked in production of many shows, rising to the top as head of production at Monozygotic. You grew into someone we all depended on. You changed your destiny with your effort. There was so much more to achieve, my friend. So many more battles to fight side by side. I can't begin to tell you how much I'll miss you. I still can't believe this virus could extinguish so bright a spark! This was not how it was supposed to end. Goodbye, Abdul. This will never be ok.

A post shared by Raghu Ram (@instaraghu) on

पुढे रघु म्हणतो, “तू अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केलं आहे. मेहनत आणि स्वत:च्या जीवावर तू प्रॉडक्शन हाऊसचा हेड बनलास. तू स्वत:चं नशीब बदलवलस. आणखी खूप काही बाकी होतं. अनेक लढाया जिंकायच्या होत्या. मी सांगू नाही शकत मी तुला किती मिस करेन. मला अजूनही विश्वास बसत नाही की, हा व्हायरस एवढ्या तेज असलेल्या प्रकाशाला विझवू शकतो. अशा प्रकारे गुडबाय करशील असं वाटलं नव्हतं अब्दुल. हे कधीच नीट होणार नाही.”

You might also like